ठाणे येथील लोकमान्यनगर भागात रविवारी सकाळी एका दाम्पत्याचा मृतदेह राहत्या घरात आढळल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. दिपक दिगंबर आंब्रे (४२) आणि दिप्ती आंब्रे (३७), अशी यातील मृत दाम्पत्याची नावे असून ते ठाणे येथील लोकमान्यनगर भागातील पाटकर हाऊसमध्ये राहत होते. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून दिपकच्या मृत्यने व्यथित होऊन दिप्ती यांनी आत्महत्या केली, असा प्राथमिक अंदाज पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सुसाईड नोटच्या आधारे वर्तविला आहे. सुसाईड नोट मधील अक्षर दिप्ती यांचे असल्याचे त्यांच्या मुलीने ओळखल्याचे त्यांनी स्पष्ट केले.