सुशांत मोरे

रूळ ओलांडताना किंवा प्रवासादरम्यान लोकल-मेल एक्स्प्रेसमधून पडून होणाऱ्या अपघाताबरोबरच रेल्वे हद्दीत करण्यात येणाऱ्या आत्महत्यांमुळे उपनगरीय लोकल वेळापत्रकावर परिणाम होत आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई हद्दीत एकूण १६८ जणांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. रेल्वे हद्दीतील आत्महत्यांचे प्रमाण २०२० च्या तुलनेत २०२२ मध्ये वाढले असून २०२२ मध्ये ७१ पुरुष आणि १६ महिला अशा एकूण ८७ जणांनी आत्महत्या केल्याचे लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीतून उघड झाले आहे.

Mumbai, BEST, Mumbai BEST buses,
मुंबई : प्रवाशांना थांब्यांवर थांबा, बहुतेक थांब्यांवर प्रवाशांना बेस्ट बससाठी तासन्तास प्रतीक्षा
Troubled by unruly rickshaw driver at Panvel station Suffering continues despite taking action
बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल
best recovered rs 40 lakhs as fine from ticketless travelers
मुंबई: बेस्ट बसमधील ६४ हजार फुकट्या प्रवाशांची धरपकड; ४० लाख रुपये दंड वसूल
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

सध्या लोकलचा प्रवास जीवघेणाच ठरू लागला आहे. गर्दीच्या वेळी लोकल डब्यात प्रवेश करण्यास मिळत नाही. परिणामी, प्रवाशांना नाईलाजाने डब्यांच्या दरवाजाजवळ उभे राहून प्रवास करावा लागतो. असा धोकादायक प्रवास करताना काही प्रवाशांचा तोल जाऊन अपघात होतो. या अपघातात प्रवाशांना प्राण गमवावे लागतात. तसेच लोकल किंवा मेल-एक्स्प्रेसची धडक लागून रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांचा अपघात होतो.

हेही वाचा: मुंबईः उपचाराच्या निमित्ताने वृद्धाची १० लाखांची फसवणूक; तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

या अपघातांमुळे लोकलचे वेळापत्रक विस्कळीत होते. त्याचबरोबर मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीत आत्महत्या करणाऱ्यांचेही प्रमाण वाढत असून त्याचाही फटका लोकलच्या वेळापत्रकाला बसत आहे. रेल्वे मार्गावर आत्महत्येचा प्रयत्न करणारा जखमी किंवा मृत झाल्यास त्याला हमालाच्या मदतीने बाजूला करण्यात येते. तोपर्यंत लोकल तेथेच खोळंबते. सर्व प्रक्रिया पार पूर्ण करण्यासाठी किंमान दहा ते वीस मिनिटे लागतात. यामुळे मागून येणाऱ्या लोकलचाही खोळंबा होतो. रेल्वेच्या हद्दीतील आत्महत्येच्या घटना रोखणे रेल्वे पोलिसांना शक्य झालेले नाही.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२० ते नोव्हेंबर २०२२ या तीन वर्षांत १६८ जणांनी रेल्वेच्या हद्दीत आत्महत्या केली असून २०२० मध्ये यापैकी २७ आत्महत्येच्या घटना घडल्या होत्या. २०२१ मध्ये ही संख्या ५४ झाली आणि जानेवारी ते नोव्हेंबर २०२२ दरम्यान तब्बाल ८७ जणांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. यापैकी ११९ आत्महत्या मध्य रेल्वेवर, तर ४९ आत्महत्या पश्चिम रेल्वेवर करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक; पुतळ्याची मंजुरी रखडल्याने काम वेग घेईना?

मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीत आत्महत्येच्या घटनांची माहिती

वर्ष मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे
२०२० १४ १३
२०२१ ४१ १३
२०२२ ६४ २३

पुरुष आणि महिलांची वर्गवारी
२०२० – पुरुष २४ आणि ३ महिला
२०२१ – पुरुष ४५ आणि ९ महिला
२०२२ – पुरुष ७१ आणि १६ महिला