भारतीय नौदलाच्या सामर्थ्याची भारतीयांना ओळख व्हावी, नौदलाचा दैदिप्यमान इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा तसेच लढाऊ युद्धनौकेची रचना आणि नौदलाच्या कार्याची सर्वसामान्यांना माहिती मिळावी या हेतूने गुरुवार, १२ जानेवारी रोजी मंत्रालयात आय. एन. एस. विक्रांत या स्वदेशी युद्धनौकेच्या प्रतिकृतीच्या प्रदर्शनाचा उद्धाटन सोहळा पार पडला. १३ ते २० जानेवारीदरम्यान दुपारी २ ते ५ या वेळेत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात या युद्धनौकैची प्रतिकृती सर्वसामान्यना पाहता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा, पुनर्विकासाविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. मंत्रालयात प्रदर्शनासाठी ठेवलेली आय. एन. एस. विक्रांतची प्रतिकृती पनवेलच्या ओरियन मॉलमधून आणण्यात आली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अमित चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही प्रतिकृती दिवाळीच्या सजावटीसाठी तयार करण्यात आली होती. नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याची बाब लक्षात घेऊन प्रशासनाने आय. एन. एस. विक्रांतची प्रतिकृती मंत्रालयात प्रदर्शनासाठी ठेवण्याचा निर्णय घेतला. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित केलेल्या उद््घाटन सोहळ्यात आकाश विश्वास आणि अरुणा विश्वास यांनी एकतारेच्या माध्यमातून भजन गायिले तसेच राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ८९ वर्षांच्या भिकल्या धिंडा यांनी तारपावाद्य वाजवून प्रेक्षकांना अचंबित केले.

हेही वाचा- मुंबई : पदवी प्रमाणपत्रासाठी १७ जानेवारीपर्यंत अर्ज सादर करता येणार

पनवेलमधील संस्कार भारती कोकण प्रांत, ओरियन मॉल आणि महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी युवक दिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त या प्रदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून भूअलंतरणच्या कलाकारांनी रांगोळीच्या माध्यमातून साकारलेल्या समुद्रात आय. एन. एस. विक्रांतची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. उद्््घाटन सोहळ्याला रघुराजे आंग्रे, कॅप्टन विजय वडेरा, मंगेश परुळेकर, दिलीपभाईं करेलिया, अमित देशमुख, प्रशांत ठाकूर, संजय शिरसाठ, आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा-

आय. एन. एस. विक्रांत युद्धनौकेची वैशिष्ट्ये

– भारतातील सर्वात मोठी पहिली स्वदेशी युद्धनौका- २६२ मीटर लांब तर, ४५ हजार मेट्रिक टन वजन- एकाचवेळी ३० लढाऊ विमाने वाहून नेण्याची क्षमता- दोन हजार सैनिकांच्या राहण्याची सोय

– वैद्यकीय आणि वैज्ञानिक प्रयोगशाळेसंबंधित सेवा

– प्रतितास ३३ किमी वेग तर, कमाल वेग प्रतितास ५१ किमी

७. दोन हजार ५०० किलोमीटरच्या केबल्सचा उपयोग

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inauguration of exhibition of replica of indigenous warship ins vikrant in the ministry print news dpj
First published on: 12-01-2023 at 22:44 IST