अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये मोफत प्रवेशासाठी उत्पन्न मर्यादा आठ लाख

आतापर्यंत वसतिगृहामध्ये विनाशुल्क प्रवेशासाठी विद्याथ्र्याच्या कुटुंबाची उत्पन्न मर्यादा अडीच लाख रुपये इतकी होती.

संग्रहीत

मुंबई : अल्पसंख्याक मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख, पारसी व ज्यू समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश घेण्यासाठी आता कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा आठ लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये पुरविण्यात येणाऱ्या खोलीभाडे, पाणी, वीज इत्यादी सुविधांचे शुल्क पूर्णपणे माफ असेल, असेही त्यांनी नमूद केले.

आतापर्यंत वसतिगृहामध्ये विनाशुल्क प्रवेशासाठी विद्याथ्र्याच्या कुटुंबाची उत्पन्न मर्यादा अडीच लाख रुपये इतकी होती. ती आठ लाखांपर्यंत वाढविण्यात आली असून त्याहून कुटुंबाचे उत्पन्न जास्त असलेले विद्यार्थीही वसतिगृह प्रवेशासाठी पात्र आहेत व त्यांना माफक दरात या सुविधा देण्यात येतील, असे मलिक यांनी स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Income limit free admission hostel minority students eight lakh akp

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या