मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील (एसआरए) दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्राप्तीकर विभागाकडून समन्स बजावण्यात आले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांना २२ नोव्हेंबरला सिंधिया हाऊस येथे चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश आयकर विभागाने दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राप्तीकर विभागाने ११ नोव्हेंबरला एसआरएतील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स बजावले आहे. शांतीलाल टांक आणि रामा मिटकर अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत. प्राप्तीकर विभागाच्या कलम १३१(१अ) अंतर्गत हे समन्स बजावण्यात आले आहे. त्यानुसार या दोन्ही अधिकाऱ्यांना २२ नोव्हेंबरला सिंधिया हाऊस येथे उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २०१६ ते २०२१ दरम्यानच्या स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या उत्पन्नाच्या स्रोतांसंबधीची कागदपत्रे, माहिती तसेच बँकेच्या खात्याची माहिती सादर करावे असेही या समन्समध्ये नमूद करण्यात आले आहे.

याविषयी शांतीलाल टांक आणि रामा मिटकर यांना विचारले असता त्यांनी अद्याप आपल्याला असे कोणतेही समन्स मिळाले नसल्याचे सांगितले. प्राप्तीकर विभागाने एकाच वेळी रामा मिटकर आणि शांतीलाल टांक यांच्यासह सुदाम परदेशी नावाच्या व्यक्तीलाही १३१(१अ) अंतर्गत समन्स बजावले आहे. मिटकर यांना २२ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता, परदेशी यांना साडेअकरा वाजता, तर टांक यांना पावणेबारा वाजता हजर राहण्यास सांगितले आहे.

उत्पन्नाच्या स्त्रोतांविषयी संशय

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी शांतीलाल टांक आणि रामा मिटकर यांनी २०१६ ते २०२१ दरम्यान स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या उत्पन्नाच्या स्रोतांसंबधीची कागदपत्रे, माहिती तसेच बँकेच्या खात्याची माहिती सादर करावी, असे प्राप्तीकर खात्याच्या समन्समध्ये नमूद करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Income tax department summons two sra officers zws
First published on: 15-11-2021 at 01:13 IST