काळबादेवी येथील आगीत गंभीर जखमी झालेले मुंबईच्या अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील नेसरीकर यांचे आज निधन झाले. गेल्या १५ दिवसांपासून नेसरीकर यांच्यावर ऐरोलीतील नॅशनल बर्न सेंटरमध्ये उपचार सुरु होते.
मुंबईतील काळबादेवी येथील गोकूळ इमारतीला १५ दिवसांपूर्वी आग लागली होती. ही आग विझवताना नेसरीकर आणि सुधीर अमिन हे दोघेजण भाजले गेले होते. यातील सुधीर अमिन यांचा गेल्या गुरुवारी मृत्यू झाला तर नेसरीकर यांच्यावर गेले १५ दिवस उपचार सुरु होते.  आगीत जवळपास ५० टक्के भाजलेल्या नेसरीकर यांना रुग्णालयात दाखल  करण्यात आल्यावर तातडीने त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करून संसर्ग होण्याचा धोका टाळण्यात आला होता. त्यानंतर पायावर त्वचारोपण करण्याची शस्त्रक्रियाही पार पडली होती. या शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती माहिती नॅशनल बर्न सेंटरचे प्रमुख डॉ. केसवानी यांनी दिली होती. मात्र, या शसत्रक्रिया निष्फळ ठरल्या असून, नेसरीकर यांनी आज अखेरचा श्वास घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalbadevi fire chief fire officer sunil nesarikar succumbs to death
First published on: 24-05-2015 at 05:56 IST