येस बँकेतील गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले डीएचएफलचे धीरज आणि कपिल वाधवान या दोघांना उच्च न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येस बँक गैरव्यवहाराप्रकरणी सीबीआयने वाधवान यांना अटक केली होती. दोघेही सध्या कारागृहात असून गेल्याच आठवडय़ात त्यांनी येस बँक तसेच उत्तर प्रदेश वीज महामंडळाच्या कर्मचारी भविष्यनिधीत अनियमितता केल्याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी दोन्ही प्रकरणात वाधवान यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेली याचिका फेटाळली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil and dheeraj wadhwan are not relieved abn
First published on: 13-05-2020 at 00:24 IST