मुंबईतील अॅंटॉप हिल परिसरात दरड कोसळून बुधवारी सकाळी दोघांचा बळी गेला. या दुर्घटनेत एक जण जखमी झाला आहे. अजून चार ते पाच जण मातीच्या ढिगाऱयाखाली सापडल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास या भागात दरड कोसळली.
दरडीचा ढिगारा हटविण्यासाठी अग्निशामक दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. घटनास्थळी अॅम्ब्युलन्सही दाखल झाली आहे. मुंबईमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी पडत असल्यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत.
(संग्रहित छायाचित्र)
संग्रहित लेख, दिनांक 10th Jul 2013 रोजी प्रकाशित
मुंबईत अॅंटॉप हिलमध्ये दरड कोसळून दोघांचा बळी
मुंबईतील अॅंटॉप हिल परिसरात दरड कोसळून बुधवारी सकाळी दोघांचा बळी गेला. या दुर्घटनेत एक जण जखमी झाला आहे.

First published on: 10-07-2013 at 10:20 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Landslide in antop hill area of mumbai