ज्येष्ठ पाश्र्वगायिका आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना शनिवारी मुंबईत त्यांच्या ‘प्रभुकुंज’ निवासस्थानी ‘स्वरमाऊली’ सन्मानाने गौरविण्यात आले. करवीर पीठाचे शंकराचार्य शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते हा सन्मान लता मंगेशकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी अन्य मंगेशकर कुटुंबीय आणि विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना लतादीदी म्हणाल्या, या आधी जगद्गुरू शंकराचार्य यांनी मला ‘स्वरभारती’ सन्मानाने गौरविले होते. आता ‘स्वरमाऊली’ या महत्त्वाच्या सन्मानासाठी माझी निवड केली आणि हा सन्मान प्रदान करण्यासाठी ते स्वत: मुंबईत आले, त्यासाठी मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते. त्यांच्याप्रति मी कृतज्ञ आहे. तर पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितले, शंकराचार्यानी आमचे वडील दीनानाथ मंगेशकर यांना ‘संगीतरत्न’ सन्मानाने, तर मला ‘भावगंधर्व’ सन्मानाने गौरविले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lata mangeshkar
First published on: 13-05-2018 at 01:20 IST