मुंबई : राज्य सरकारमधील काही मंत्र्यांनी पितृपक्ष असल्याने अद्याप मंत्रालयातील दालनात कार्यभार स्वीकारलेला नाही, असे कळते. परंतु जग कुठे चालले आहे आणि यांचा पितृपक्षामुळे कारभार अडला आहे, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली.

विधानभवनात आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी काही मंत्र्यांनी अजून कार्यभार स्वीकारला नसल्यामुळे लोकांची कामे अडून पडली आहेत, याकडे लक्ष वेधले. सध्या पितृपक्ष सुरू आहे. त्यामुळे काही मंत्र्यांनी कार्यभार स्वीकारलेला नाही, असू सांगून, असे कुठे असते का, जग कुठे चालले आहे, असा सवाल करीत त्यांनी शिंदे मंत्रिमंडळातील मंत्र्यांना फटकारले.

Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
wardha lok sabha seat, MP ramdas tadas , MP ramdas tadas s Son Pankaj Tadas, Pankaj Tadas defend his side, over Estranged Wife Pooja s Dispute, sushma andhare, pooja tadas, bjp, maha vikas aghadi, wardh politics, politics news
“सुषमा अंधारे यांनी माझी बाजू ऐकली असती तर विरोधात बोलल्या नसत्या,” पंकज तडस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
EKnath Shinde and Uddhav Thackeray (1)
“दोन प्रादेशिक पक्षांकडे अजेंडा अन् झेंडाही नाही, त्यांच्यामुळे काँग्रेसची…”, मुख्यमंत्र्यांचा मविआला टोला
dombivli marathi news, dombivli varun sardesai marathi news
“श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्धच्या नकारात्मक वातावरणामुळे उमेदवारी घोषित करण्यास टाळाटाळ”, शिवसेना युवा नेते वरूण सरदेसाई यांची टिपण्णी

देवदर्शनासाठी किती वेळ?

गणेशोत्सव काय राज्यात प्रथमच साजरा होतो आहे असे नाही. आम्हीही दर्शनासाठी जात असतो. पण राज्याच्या महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने देवदर्शनासाठी किती वेळ घालवायचा त्याला काही मर्यादा असतात. मिरवणुका किती काळ चालणार यालाही काही बंधने हवीत. ३६ तास मिरवणुका चालल्याबद्दलही अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.