आरे कॉलनीत बिबटय़ाचे हल्ले, चिमुरडीचा मृत्यू

गोरेगावच्या आरे कॉलनीत बिबटय़ाने एकाच दिवसात दोन हल्ले केले. मंगळवारी पहाटे झालेल्या हल्ल्यात रिया मेसी या चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.

गोरेगावच्या आरे कॉलनीत बिबटय़ाने एकाच दिवसात दोन हल्ले केले. मंगळवारी पहाटे झालेल्या हल्ल्यात रिया मेसी या चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. तर संध्याकाळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ११ वर्षीय सुनिल भवर हा मुलगा जखमी झाला.
गोरेगावचा आरे कॉलनी परिसराच्या लगत हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे जंगल आहे. या आरे कॉलनीतील खडकपाडा वसाहतीत राहणारी रिया मेसी  ही चिमुरडी पहाटे प्रात:विर्धीसाठी बाहेर गेली होती. त्यावेळी अंधारात बिबटय़ाने तिच्यावर हल्ला केला. तिच्या किंकाळय़ा ऐकून स्थानिक रहिवासी मदतीला धावले.  तेव्हा बिबटय़ा जखमी रियाला सोडून पळून गेला. रियाला उपचारासाठी तातडीने गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे तिचा मृत्यू झाला.
ही घटना उलटून १२ तास लोटतात न तोच संध्याकाळी पुन्हा बिबट्याने आरे कॉलनीतील नवापाडा येथे एका मुलावर हल्ला केला. सुरेश भवर (११) हा मुलगा संध्याकाळी आपल्या वडिलांसोबत रस्त्यावरून जात होता. त्याचवेळी मागून आलेल्या बिबटय़ाने त्याच्यावर हल्ला केला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एकाच दिवशी झालेल्या दोन हल्ल्यांनी परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Leopard snatches girl 4 as gran looks on

ताज्या बातम्या