बिबटय़ाने बालिकेस पळविले

वाडा तालुक्यातील गुंज गावातील वनक्षेत्रात राहणाऱ्या एका चार वर्षीय बालिकेला अंगणात खेळत असताना बिबटय़ाने पळविल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.

वाडा तालुक्यातील गुंज गावातील वनक्षेत्रात राहणाऱ्या एका चार वर्षीय बालिकेला अंगणात खेळत असताना बिबटय़ाने पळविल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेमुळे गुंज गावातील ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मूळ गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर जंगल परिसरात शिवा भोईर यांचे एकटय़ाचे घर आहे. बुधवारी सकाळी १० वाजता त्यांची चार वर्षीय मुलगी छकुली घरासमोरील अंगणात खेळत होती. त्या वेळी शिवा भोईर यांच्या डोळ्यादेखत बिबटय़ाने तिला पळवून नेले. या घटनेमुळे शिवा भोईर भेदरले आहेत. या घटनेनंतर पोलीस आणि तहसील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Leopard takes girl child

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या