नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक सुनीलकुमार लोहारिया यांच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी बांधकाम व्यावसायिक सुमीत बच्चेवार यांना अटक केली. 
बच्चेवार यांचे सुरेश बिजलानी यांच्याशी जवळचे संबंध होते. लोहारिया यांच्या हत्येप्रकरणी पोलिस सुरेश बिजलानी यांच्या शोधात आहेत. त्याला पोलिसांनी फरार म्हणून घोषित केले आहे. दोन महिन्यांपूर्वी लोहारिया यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये त्यांना १८ दिवसांची पोलिस कोठ़डीही सुनावण्यात आली होती. हा गुन्हा दाखल करण्यामागे बच्चेवार यांचाच हात असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली. लोहारिया यांची १६ फेब्रुवारी रोजी नवी मुंबईतील त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.