मुंबई : गेल्या कित्येक शतकांत मानव व प्राण्यांतील बदलत गेलेल्या नात्यापासून सध्या परवलीचा शब्द असलेल्या मेटाव्हर्सपर्यंत आणि एव्हरेस्टच्या शिखरापासून मानसच्या जंगलापर्यंत विविध विषयांना स्पर्श करणारा ‘लोकप्रभा दिवाळी अंक २०२२’ प्रकाशित झाला आहे. अंक राज्यभर सर्वत्र उपलब्ध आहे केवळ ५० रुपयांत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२० लाख वर्षांपूर्वी शाकाहारी असणारा मानव मांसाहाराकडे कधी, का आणि कसा वळला असावा? या प्रदीर्घ सहप्रवासात मानव आणि प्राण्यांतील नाते कसे बदलत गेले आणि भविष्यात सहजीवन कायम राखण्यासाठी काय केले पाहिजे, याचा लेखाजोखा डॉ. उज्ज्वला दळवी यांनी ‘गोष्ट मनुष्यप्राण्यांची’ या लेखात घेतला आहे. ‘मेटा मनमर्जियाँ’ या लेखात दिलीप टिकले यांनी वास्तव जगावर आभासी जगाने कसे गारूड केले आहे, याचा वेध घेतला आहे. या दोन्ही जगांतील अस्पष्ट होत जाणाऱ्या सीमारेषांविषयीही त्यांनी भाष्य केले आहे. मिरेया मेयर ही वकील होण्याचे स्वप्न बाळगणारी मुलगी, महाविद्यलयात असताना फुटबॉल सामन्यांत चीअरगर्लचं काम करणारी. एका चित्रपटाने तिच्या आयुष्याला अगदी वेगळे वळण दिले आणि तिने आपले संपूर्ण आयुष्य वन्यजीवांसाठी वाहिले. तिची वाटचाल डॉ. विनया जंगले यांनी शब्दबद्ध केली आहे. एव्हरेस्टवर गिर्याहोरण मोहिमा सुरू झाल्या १९२२पासून. यंदा त्याला १०० वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्ताने गेल्या १०० वर्षांंच्या काळात एव्हरेस्ट मोहिमांचे स्वरूप कसे बदलत गेले, याचा आढावा हृषीकेश यादव आणि सुहास जोशी यांनी ‘एव्हरेस्ट मोहिमेची शंभरी’ या लेखात घेतला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokprabha diwali 2022 issue published zws
First published on: 21-10-2022 at 05:30 IST