माझी आई.. शकुंतला परांजपे. साहित्य, नाटक, बालनाटय़, आकाशवाणी, दूरदर्शन व चित्रपट या माध्यमांमधून मी पुढे जी काही थोडी कामगिरी करू शकले ते केवळ तिच्या तपश्चर्येमुळेच! माझ्या प्रत्येक कलाविष्कारात आईच्या पाऊलखुणा आढळतात. तिचे कर्तृत्व आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व लक्षात घेता तिला तिच्या योग्यतेच्या कोणत्याही क्षेत्रात उच्च पद मिळविता आले असते. विद्वत्ता, प्रखर बुद्धिमत्ता, मराठी, इंग्रजी, फ्रेंच भाषांवर प्रभुत्व, केंब्रिजची एमएची पदवी, आयएलओमध्ये केलेली नोकरी, लेखिका म्हणून झालेले नाव आणि अर्थातच महापुरुष रँग्लर परांजपे यांची कन्या म्हणून मिळालेले वारसाप्राप्त वलय एवढे विपुल भांडवल असूनही तिने स्वत:च्या भलाईसाठी य:कश्चितही हालचाल केली नाही. तिचे सर्व प्रयास, तिची अवघी ऊर्जा एकाच बिंदूवर केंद्रित झाली होती – आपल्या एकुलत्या एक मुलीचा सर्वागीण विकास! मला ‘सर्वगुणसंपन्न’ करण्याच्या आईच्या ध्यासापोटी मला अनेक दिव्यांमधून जावे लागले.  
आईने जरी कोणत्याही नियमबद्ध चाकोरीमध्ये स्वत:ला अडकवून घेतले नाही, तरी ती नित्यनवीन आव्हानांचा वेध घेत असे. शकुंतला परांजपे हे नाव ती लेखिका असल्यामुळे परिचित असले तरी माझ्या मते तिची खरी ओळख तिने संततिनियमनाच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळे नोंदवली जावी. रघुनाथ धोंडो कर्वे तेव्हा समाजात संततिप्रतिबंधाचा प्रचार करण्याच्या प्रयत्नांत होते.. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आईने या खडतर कार्याचा श्रीगणेशा केला..

‘लोकसत्ता’च्या ६६ व्या वर्धापनदिन विशेषांकाच्या अतिथी संपादक, ज्येष्ठ लेखिका आणि रंगकर्मी.

वर्धापनदिन विशेषांकाच्या पुरवणीतील लेख –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

1) एकमेवाद्वितीय! माझी आई.. शकुंतला परांजपे
2) होमाई व्यारावाला आऊट ऑफ द फ्रेम
3) ओसिओला मकार्टी ‘आदर्श’ धोबीण