चूल आणि मूल एवढीच ओळख असलेल्या स्त्रियांचे विश्व आता शिक्षण व नोकरीपलीकडेही विस्तारले आहे. करिअर आणि आवडीसाठी जगाच्या कानाकोपऱ्यात फिरणाऱ्या स्त्रियांचे स्वत:चे विश्वही प्रसरण पावते आहे. मात्र हे सर्व सहजसोपे नक्कीच नाही. कुटुंबाची मुख्य जबाबदारी पेलताना स्वत्व जपत आणि इतरांना प्रेरणा देत केलेला हा प्रवास खडतर व तेवढाच रंजकही आहे. या प्रवासाची कथा वेगवेगळ्या विषय माध्यमांमधून ‘बदलता महाराष्ट्र’च्या व्यासपीठावर दोन दिवस उलगडत जाईल. या परिषदेचे उद्घाटन अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या हस्ते होत आहे तर समारोप सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांच्या मार्गदर्शनाने होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्त्री-पुरुष समानतेच्या पुढे जात स्त्रीत्वाच्या कक्षा रुंदावणाऱ्या आधुनिक विश्वात आपण नेमक्या कुठे आहोत व कुठे जाण्याची गरज आहे याचा ऊहापोह या परिषदेत केला जाईल. नवीन समाजरचनेतील महत्त्वाच्या विषयांवर – शिक्षण, उद्योग, पायाभूत सुविधा, नागरिकीकरण, पर्यावरण – याआधीच्या बदलत्या महाराष्ट्र परिषदांमध्ये प्रकाश टाकण्यात आला होता. त्यापुढे एक पाऊल पुढे जात जागतिक महिला दिनाच्या पाश्र्वभूमीवर स्त्री-विश्वाचे नानाविध पलूंचे दर्शन यावेळी ‘बदलता महाराष्ट्र’मध्ये घडेल.

टीजेएसबी सहकारी बँक लि. प्रस्तुत ‘लोकसत्ता बदलता महाराष्ट्र’, सहप्रायोजक एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर्स डेव्हलपर्स लि., टेलिव्हिजन पार्टनर ‘झी २४ तास’.

More Stories onमहिलाWoman
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta badalta maharashtra for woman
First published on: 06-03-2016 at 04:06 IST