‘बदलता महाराष्ट्र’ उपक्रमात ‘कर्ती आणि करविती’ परिषद

शिक्षण आणि आíथक स्वावलंबनातून स्वातंत्र्याची चव चाखायला मिळालेल्या महिला आता समाजाला दिशाही देत आहेत. विविध क्षेत्रांवर ठसा उमटवलेल्या या स्त्रिया वैयक्तिक स्वातंत्र्यापासून सामाजिक जाणिवेपर्यंतच्या विचारमंथनासाठी एकत्र येत आहेत. लोकसत्ताच्या बदलता महाराष्ट्र या उपक्रमाच्या कर्ती आणि करविती या ९ आणि १० मार्चला होत असलेल्या परिषदेत हा आढावा घेतला जाईल.

विषय आणि वक्त्या..

प्रशासनातली ‘ती’ : नगरविकास खात्यात सचिव पदावर कार्यरत असलेल्या मनीषा म्हैसकर, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी असलेल्या वसुधा कामत, पोलीस उपायुक्तपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या रश्मी करंदीकर आणि अग्निशमन अभियंता असलेल्या हर्षनिी कान्हेकर

एक ‘ती’चा लढा : अभिनेत्री शुभांगी गोखले, सुपरमॉडेल अ‍ॅलिशिया राऊत आणि मुस्लीम महिला आंदोलनकर्त्यां नूरजहाँ साफिया नियाज

अग्निपरीक्षा आणखी किती? : माजी महापौर शुभा राऊळ, महिला राजसत्ताक आंदोलनातील प्रमुख कार्यकर्ती नीला लिमये आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

‘ती’ आणि धर्म : साहित्यिक आणि इतिहास अभ्यासक मंगला सामंत, साहित्यिक ऊर्मिला पवार आणि इतिहास प्राध्यापक मोहसिना मुकादम

वेगळ्या वाटेवरचे

टाटा मूलभूत संशोधन संस्थेतील संशोधक शुभा टोळे, जाहिरातकर्मी प्रीती नायर, राइट टू पी आंदोलनाच्या समन्वयक सुप्रिया सोनार आणि भांडवली बाजारातील व्यवहारांबाबत महिलांमध्ये आíथक साक्षरतेसाठी काम करणाऱ्या पूर्णिमा शिरिषकर

पक्षीय भेदापलीकडची ‘ती’ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण, भाजपच्या आमदार मेधा कुळकर्णी आणि काँग्रेस आमदार प्रणिती िशदे