पर्यावरणस्नेही गणेशोत्सवासाठी

पर्यावरण जतन आणि संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि ‘लोकसत्ता’ यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीही ‘पर्यावरणस्नेही घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०१६’ आयोजित करण्यात आली आहे.

पर्यावरणस्नेही साहित्याचा वापर करून गणरायाची आरास करणाऱ्या गणेशभक्तांना या स्पध्रेत सहभागी होता येईल. या स्पर्धेसाठी ‘चितळे डेअरी’ यांचे सहकार्य लाभले आहे. ही स्पर्धा मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, नागपूर विभागात घेण्यात येणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस, थर्माकोलसारख्या पर्यावरणघातक वस्तूंच्या वापराचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाची संकल्पना भाविकांमध्ये रुजत चालली आहे. पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून घरगुती गणेशोत्सव साजरा केला जात आहे. याला अधिक चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत प्रथम पारितोषिक ९९९९ रुपयांचे व द्वितीय पारितोषिक ६६६६ रुपयांचे आहे. तर विशेष पारितोषिक २००१ रुपयांचे आहे. रोख रकमेबरोबरच विजेत्यांना मानचिन्ह आणि प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.

दीड ते अकरा दिवसांपर्यंत घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेशभक्तांना स्पध्रेत भाग घेता येईल. ‘लोकसत्ता’च्या विभागीय कार्यालयांमध्ये १४ सप्टेंबपर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपण वापरलेल्या साहित्याची माहिती, छायाचित्रे, संपर्क, पत्ता आदी माहितीसह स्वीकारली जाईल. छायाचित्र व माहिती टपाल, कुरिअरच्या माध्यमातून किंवा ’‘२ं३३ं.ीू2016@ॠें्र’.ूे या ई-मेलवर पाठवता येईल. मुदतीनंतर आलेल्या छायाचित्रांचा विचार स्पध्रेसाठी केला जाणार नाही. गणेशमूर्ती व सजावट पर्यावरणस्नेही असावी. प्लास्टिक, थर्माकोलचा वापर नसावा. छायाचित्रात गणेशमूर्ती, मखर आणि सजावट स्पष्ट दिसावी. त्यासाठी छायाचित्रे (वेगवेगळ्या कोनातून काढलेली) काढून पाठवायची आहे. मूर्ती व सजावटीची तीन छायाचित्रे ‘पाच बाय सात’ आकाराची व रंगीत असावी. प्रत्येक छायाचित्राच्या सोबत स्पर्धकाचे नाव, पत्ता, दूरध्वनी, मोबाइल, ई-मेल, वापरलेल्या साहित्याची यादी जोडावी. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

अधिक माहितीसाठी संपर्क

मुंबई – लोकसत्ता, ब्रॅण्ड विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, दुसरा मजला, नरिमन पॉइंट, दूरध्वनी- ६७४४०३६९.

ठाणे –  लोकसत्ता, कुसुमांजली, दुसरा मजला, गोखले रस्ता, नौपाडा, दूरध्वनी-२५३९९६०७.

नाशिक – वंदन चंद्रात्रे, लोकसत्ता ६, स्टेडियम कॉम्प्लेक्स, महात्मा गांधी रोड, भ्रमणध्वनी क्रमांक-९४२२२४५०६५.

पुणे – रोहित कुलकर्णी, दि इंडियन एक्स्प्रेस प्रा. लि., एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट क्रमांक १२०५/२/६, शिरोळे रोड, शिवाजीनगर, दूरध्वनी – ०२०/६७२४१०००.

औरंगाबाद – मुकुंद कानिटकर, १०२ गोमटेश मार्केट, न्यू गुलमंडी रोड, औरंगाबाद- ४३१००१, दूरध्वनी – ०२४०/२३४६३०३.

अहमदनगर – संतोष बडवे, पहिला मजला, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर-४१४००१, भ्रमणध्वनी-०९९२२४००९८१.

नागपूर – ज्ञानेश्वर महाले, वितरण विभाग, १९, ग्रेट नाग रोड, उंट खाना, वैद्यनाथ स्क्वेअरजवळ, नागपूर, दूरध्वनी- ०७१२-२७०६९३२३/९८२२७२०००९.