मुंबईत आज व उद्या कार्यशाळा; अश्विनी जोशी यांच्या हस्ते उद्घाटन
दहावी-बारावीनंतरच नव्हे तर पदवीनंतर काय करायचे, याचे खात्रीशीर आणि समाधानकारक उत्तर करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावरच मिळावे यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मार्ग यशाचा’ या कार्यशाळेचे उद्घाटन मुंबईच्या (शहर) जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात येणार आहे. गुरुवार आणि शुक्रवारी प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़मंदिर येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही कार्यशाळा चालणार आहे. प्रत्येक सत्रात विद्यार्थ्यांना तज्ज्ञांना प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेता येईल.
दहावी-बारावीच नव्हे तर पदवीनंतरच्या पर्यायांचीही पुरेशी माहिती नसल्याने विद्यार्थी गोंधळून गेलेले असतात. अशा विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध टप्प्यांवरील पर्यायांची माहिती ‘मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत करून देण्यात येईल. कला, विज्ञान, वाणिज्य, ललित कला या विद्या शाखांमधील विविध अभ्यासक्रमांची माहिती संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ करिअर समुपदेशक करून देतील.
या विषयांतील विविध अभ्यासक्रम, त्यांच्या प्रवेश परीक्षा, त्यात असलेल्या उच्च शिक्षणाच्या संधी, त्यातून खुले होणारे करिअरचे विविध मार्ग अशा विविध पातळ्यांवर ‘व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था’ (आयव्हीजीएस) या राज्य सरकारच्या जुन्या व नामांकित संस्थेचे अनुभवी व तज्ज्ञ समुपदेशक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत दोन्ही दिवशी एकच वक्ते असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी-पालकांना आपल्या सोयीनुसार या कार्यशाळेत सहभागी होता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण
प्रवेशिका रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी आणि विद्यालंकार क्लासेस, हिंदू कॉलनी येथे तसेच शनिवार आणि रविवार वगळता ‘लोकसत्ता’च्या नरिमन पॉइंट येथील कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मिळतील. पन्नास रुपये इतके प्रवेशिकेचे शुल्क आहे. in.bookmyshow.com या संकेतस्थळावरही तिकिटे आहेत. (प्रथम येणाऱ्यास प्राधान्य)

अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटीने प्रेझेंट केलेल्या व विद्यालंकार क्लासेसच्या सहकार्याने होत असलेल्या आणि सपोर्टेड बाय युक्ती तसेच पॉवर्ड बाय गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन, अरेना अ‍ॅनिमेशन एन.ए.एम.एस. शिप मॅनेजमेंट प्रा. लि., सास्मिरा, एज्यू ऑप्शन्स जर्मनी आणि एलटीए स्कूल ऑफ ब्यूटी आदींच्या विद्यमाने होत असलेल्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’चे ‘नॉलेज पार्टनर’ ‘आयटीएम’ हे आहेत.

विषय आणि वक्ते
१) क-कलचाचणीचा आणि करिअरचाही
– दीपाली दिवेकर, करिअर समुपदेशक, आयव्हीजीएस
२) कला क्षेत्रातील वळणवाटा
– नीता खोत, करिअर समुपदेशक, आयव्हीजीएस
३) वाणिज्यमधील करिअर व्यवहार
– सुरेश जंगले, करिअर समुपदेशक, आयव्हीजीएस
४) ललित कलांतील ‘संधी’राग’
– जयवंत कुलकर्णी, करिअर समुपदेशक, आयव्हीजीएस
५) विज्ञान शाखेतील करिअर ‘विज्ञान’
– विवेक वेलणकर, करिअर समुपदेशक

 

कुठे : रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी
कधी : सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजता

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta marg yashacha
First published on: 19-05-2016 at 02:33 IST