‘लोकसत्ता’चे विशेष प्रतिनिधी संदीप आचार्य यांच्या पत्नी प्रेरणा आचार्य यांचे सोमवारी दुपारी येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ४६ वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे पती, कन्या संपदा असा परिवार आहे.प्रेरणा आचार्य यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा शिवाजी पार्क विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक तसेच माध्यम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.