पावसाचा अंदाज कसा बांधला जातो, पाऊस अंदमानात दाखल झाल्यानंतर राज्यात येईपर्यंत त्याला वेळ का लागतो, त्याच्या प्रवासात कोणते अडथळे येतात, यावर्षीचा पाऊस कसा असेल अशा पाऊस आणि आपल्या जगण्यासंबंधातील अनेक प्रश्नांचा उलगडा ‘लोकसत्ता विश्लेषण’ या विशेष वेबसंवादात होईल. भारतीय हवामान विभागाच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांच्याशी या कार्यक्रमात थेट संवाद साधता येईल. मोसमी पाऊस हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. त्याचे आगमन आणि परतीच्या प्रवासातील वेळा बदलल्या की जगण्याची सारी गणिते बदलतात. मोसमी पावसाच्या बदलामागचे विज्ञान सहजसोप्या भाषेत होसाळीकर उलगडतील. सोमवारी (१५ जून) सायंकाळी ७ वाजता हा वेबसंवाद होणार आहे. या  वेबसंवादाचे सहप्रायोजक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे.

सहभागी होण्यासाठी..  https://tiny.cc/LS_Vishleshan_15June  येथे नोंदणी करावी.