भरोच ते तळोजा असा प्रवास करणाऱ्या कार्बोनिक कंपनीच्या हायड्रोजन गॅस सिलिंडर गॅसच्या टाक्या घेऊन जाणाऱ्या टँकरने संरक्षक भिंतीला धडक दिली. ज्या अपघातात गॅस टँकरने पेट घेतला. मंगळवारी दुपारी 4 च्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात गॅस सिलिंडरने पेट घेतल्याने चालक आणि क्लिनर स्वतःची सुटका करून घेऊ शकले नाहीत. यातच त्यांचा मृत्यू झाला. ड्रायव्हरचे नाव अवत बिहारी असे आहे. घटना घडताच वाचण्याच्या प्रयत्नात आजूबाजूचे 8 ते 10 जण जखमी झाले आहेत. जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा अपघात झाल्यानंतर या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली होती. या टँकरने स्फोट घेतल्यानंतर 25 सिलिंडर्स पूर्वेला असलेल्या अप्सरा या हॉटेलजवळ उडाले. त्यापैकी एक सिलिंडर मॅजिक या मोटारीवर पडला त्यामुळे त्या मोटारीलाही आग लागली. तर या पेटलेल्या टँकरचा टायर पश्चिमेला असलेल्या भंगार दुकानाजवळ उडाला. त्यामुळे तिथेही आग लागली.

2013 मध्ये चारोटी नाका भागात अपघात घडून 9 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेने त्याच आठवणी ताज्या केल्या.
चारोटी नाका येथील दुकानदारांनी दुकाने रिकामी करुन सुरक्षित स्थळी धाव घेतली. कासा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती आटोक्यात आणली. करून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. कासां पोलिसांनी अपघात घडताच घटनास्थळी धाव घेतली.व परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातानंतर चार ते पाच स्फोट झाल्याचीही माहिती मिळते आहे. या रस्त्यावरची वाहतूक विक्रमगड मार्गे वळण्यात आल्याचीही माहिती मिळते आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lpg cylinder truck caught fire on mumbai ahamdabad highway
First published on: 22-01-2019 at 17:05 IST