मुंबई म्हाडाच्या अध्यक्षपदाची सूत्रे मधु चव्हाण यांनी स्वीकारली

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते मधु चव्हाण यांनी मंगळवारी मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते मधु चव्हाण यांनी मंगळवारी मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. मंडळाच्या मुख्यालयात राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता तसेच उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांनी मधु चव्हाण यांचे स्वागत केले. राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी मुंबई म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर मा. मधु चव्हाण यांनी लगेचच औपचारिक स्वागत समारंभ टाळून पदाची सूत्रे स्वीकारली व कामाला सुरुवात केली.

त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली व मुंबई म्हाडातर्फे सध्या चालू असलेल्या सर्व प्रकल्पांची माहिती घेतली. म्हाडाच्या प्रत्येक विभागाच्या कामाचा ते आढावा घेणार असून त्यासाठी स्वतंत्र बैठकांचे आयोजन करण्यात येईल. आज, बुधवार, दि. 5 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता पहिली बैठक बीडीडी चाळींच्या पुनर्वसनासाठी म्हाडातर्फे चालू असलेल्या कामांविषयीची झाली. त्यानंतर दररोज विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा ते घेतील.

नागरिकांच्या म्हाडाविषयीच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मधु चव्हाण यांना कार्यालयात भेटता येईल. लवकरच त्यासाठी आठवड्यातील ठराविक दिवस व वेळ जाहीर करण्यात येईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Madhu chavan accepted the charge of mumbai mhada