उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला महाराष्ट्र एटीएस (दहशतवाद विरोधी पथक) च्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. कामरान अमीन असं या आरोपीचं नाव असून एटीएसच्या काळाचौकी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कामरानने उत्तर प्रदेश सरकारच्या सोशल मीडिया हेल्प डेस्कवर फोन करुन, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना बॉम्ब हल्ल्यात मारलं जाणार आहे अशी धमकी दिली. यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी लखनऊ मधील गोमती नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने तपास केला असता ज्या मोबाईल नंबरवरुन धमकीचा फोन करण्यात आला तो मुंबईतला असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांना याविषयी माहिती देण्यात आली.

धमकीचा फोन केल्यानंतर कामरानने आपला मोबाईल बंद ठेवला होता. मात्र तांत्रिक सहाय्याच्या आधारावर पोलिसांनी हा फोन मुंबईच्या चुनाभट्टी भागात शेवटचा स्विच ऑन केला गेला होता हे शोधून काढलं. यानंतर एटीएसच्या अधिकाऱ्यांनी चुनाभट्टी परिसरातील म्हाडा कॉलनी परिसरात तपास केला असता, कामरान अमिनचं नाव समोर आलं. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कामरानला अटक केली आहे. कामरानने आपला एटीएस अधिकाऱ्यांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. रविवारी कोर्टासमोर सादर करण्यात आल्यानंतर कामरानला उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra ats arrests man for threatening to assasinate yogi adityanath psd
First published on: 24-05-2020 at 11:40 IST