मुंबईतील वाहतूक कोंडीवर मात करून मुंबईचा वेग वाढवणाऱ्या दहिसर-मानखुर्द आणि वडाळा-कासारवडवली या दोन मेट्रो रेल्वे प्रकल्पांना आणि वांद्रे-कुर्ला संकुलाजवळील चार उड्डाणपूल आणि रस्त्याच्या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) बैठकीत मान्यता दिली.
त्यामुळे २००९पासून रखडल्याने नुकत्याच रद्द झालेल्या चारकोप-मानखुर्द मेट्रो रेल्वेची फेरआखणी होऊन हा प्रकल्प मार्गी लागत आहे. आता चारकोपऐवजी दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द असा ४० किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गावर मेट्रो रेल्वे धावणारआहे. त्याचबरोबर वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या ३२ किलोमीटर लांबीच्या मेट्रोला मंजुरी देण्यात आली.  आता या प्रकल्पांना मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल व नंतर त्यांची निविदा प्रक्रिया होऊन काम सुरू होईल. या दोन्ही मेट्रो रेल्वेचे काम २०१५ च्या अखेपर्यंत वा २०१६ च्या आरंभी सुरू करण्याचे नियोजन असून २०२१ पर्यंत प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

-दहिसर-मानखुर्द मेट्रो पूर्ण भुयारी. मार्गावर ३६ स्थानके
-सात स्थानके ही उपनगरीय रेल्वे, मोनोरेलशी संलग्न.
-गाडी आठ डब्यांची, ३०९० प्रवाशांची वहन क्षमता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government clears mankhurd kasarvadavali metro projects
First published on: 21-11-2014 at 03:21 IST