आपण महाविकास आघाडीच्या पाठीशी असल्याचं अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान गुवाहाटीला येण्यासाठी आपल्यालाही फोन आला होता असा खुलासा देवेंद्र भुयार यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. जे चित्र राज्यात दिसत आहे ते दोन दिवसानंतर बदललं असेल असा दावाही त्यांनी केला आहे.

“एकनाथ शिंदे यांच्यासोबतची सगळी यंत्रणा हालू झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व अपक्ष आमदारांना सोबत घ्या अशा सूचना देण्यात आल्या होत्या. आमचे सहकारी मित्र असणाऱ्या दोन-तीन आमदार मित्रांचे फोन आले. मी त्यांना आपण महाविकास आघाडीसोबत असल्याचं सांगितलं,” अशी माहिती देवेंद्र भुयार यांनी दिली आहे.

Manoj Jarange Patil On BJP
Manoj Jarange : मनोज जरांगे यांचा भाजपाला इशारा; म्हणाले, “२०२४ मध्ये सगळ्यात मोठा…”
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Devendra Fadnavis On Ramdas Kadam
Devendra Fadnavis : महायुतीत धुसफूस? “मग आम्हालाही ५० गोष्टी बोलता येतात”, देवेंद्र फडणवीसांचा शिंदे गटाच्या नेत्याला इशारा
MP Praniti Shinde says Opposition leader is our Chief Minister
चंद्रपूर : खासदार प्रणिती शिंदे म्हणतात, ‘विरोधी पक्ष नेता आमचा मुख्यमंत्री…’
What Devendra Fadnavis Said About Manoj Jarange ?
Devendra Fadnavis : ‘मनोज जरांगे तुम्हालाच का टार्गेट करतात?’ देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर म्हणाले; “त्यांना..”
What Devendra Fadnavis Said About Anil Deshmukh?
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं गाण्याच्या एका ओळीत अनिल देशमुखांच्या आरोपांवर उत्तर, म्हणाले…
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis : “आज काल मी सगळ्यांचा लाडका झालो आहे, त्यामुळे रोज…”, देवेंद्र फडणवीस यांची तुफान टोलेबाजी
What Devendra Fadnavis Said About Uddhav Thackray?
Devendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंना हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना पाहिलं तेव्हा..”, देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका

Maharashtra Political Crisis Live : “भाजपाकडून आमदारांचे हे हाल, तर सामान्य जनतेचं काय?”; नाना पटोलेंचा सवाल; वाचा प्रत्येक अपडेट…

“महाविकास आघाडी आजही अस्तित्वात आहे आणि भविष्यातही राहील. महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही. जे चित्र आहे दिसत आहे ते दोन दिवसानंतर बदललं असेल,” असा दावा देवेंद्र भुयार यांनी केला आहे.

“आधी सोबत गुवाहाटीला या त्यानंतर कोणतं मंत्रीपद द्यायचं वैगेरे त्यासंबंधी विचार करु असं मला सांगण्यात आलं होतं. मला तीन ते चार जणांचे फोन आले होते. पण त्यांचं नाव उघड करु शकत नाही. राजकीय गोपनियता ठेवावी लागणार आहे,” असंही ते म्हणाले.

Maharashtra Political Crisis: विमानात बसलेलो असतानाही अयोध्येला जाण्यापासून का रोखलं?; बंडखोर आमदाराचा उद्धव ठाकरेंना जाहीर सवाल

“भाजपानेच हे षडयंत्र आखलं असून पडद्यामागून तेच सगळं करत आहेत. ५० टक्के ईडीचा आणि ५० टक्के भाजपाच्या प्रमुखांचा यात वाटा आहे. दोघांनी मिळून ठरवून हे सगळं केलं आहे,” असा दावा देवेंद्र भुयार यांनी केला आहे.