‘महाविकास आघाडीतील नेत्यांना घाबरवण्यासाठी देशमुखांना अटक’

राजकीय सुडापोटी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक के ल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केला.

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडीमधील नेत्यांना घाबरवण्यासाठी राजकीय सुडापोटी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक के ल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केला. देशमुख यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह कसे पळाले, याचे कें द्र सरकारने व भाजपने उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी के ली.  

ईडीने देशमुख यांच्यावर के लेल्या अटके च्या कारवाईवर प्रतिक्रिया व्यक्त करताना मलिक म्हणाले की, पुढचा नंबर परिवहनमंत्री अनिल परब यांचा आहे, असे भाजपच्या नेत्यांनी सोमवारी ट्वीट केले होते. याचा अर्थ सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mahavikas aghadi in the state political sudapoti former home minister anil deshmukh central government bjp akp