महाराष्ट्र हायब्रीड सीड कंपनीचे संस्थापक आणि मराठवाड्यातील ज्येष्ठ उद्योजक डॉ. बद्रीनारायण बारवाले यांचे सोमवारी मुंबईत निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत बारवाले यांच्यावर रात्री ८.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बारवाले यांनी महिकोच्या माध्यमातून भरपूर उत्पादन देणारे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत कृषी क्रांती घडवून आणली. त्यांच्या या कार्यामुळे बियाणे-उद्योग हे एक क्षेत्रच खासगी उद्योगक्षेत्राला मिळाले. अशा प्रकारच्या बियाणांचा शोध लावल्यानंतर त्याचे देशभर वितरण, ते साठवण्याची सुविधा अशा पूरक व्यवसायांचाही विस्तार झाला. त्यातून अनेकांना रोजगार मिळाला. त्याबरोबरच कृषी क्षेत्रात क्रांती झाली. त्याच्या अतुलनिय कामगिरीबद्दल २००१ साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ हा पुरस्काराने सन्मान केला होता. तसेच १९९८ साली त्यांना वर्ल्ड फूड प्राईज फाऊंडेशन अमेरीका यांच्याकडून ‘वर्ल्ड फूड प्राईज’ या किताबाने गौरवण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahyco seeds limited founder badrinarayan barwale passed away
First published on: 24-07-2017 at 19:13 IST