ठाणे स्थानक परिसरात खासगी विमा कंपनीची फ्रेंचाईजी चालविणाऱ्या मालकास दोन महिला कर्मचाऱ्यांची छेड काढल्याच्या कारणावरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी बेदम मारहाण केली. या प्रकरणी ठाणेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून मालकास अटक केली़, मुस्ताक शेख(२३), असे या मालकाचे नाव आह़े  ठाणे स्थानक परिसरात त्याने खासगी विमा कंपनीच्या फ्रेंचाईजीचे कार्यालय थाटले असून या कार्यालयात काम करणाऱ्या दोन महिला कर्मचाऱ्यांची त्याने छेड काढली होती. याबाबत माहिती मिळताच महिलेच्या भावाने काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मदतीने शुक्रवारी त्याला बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला ठाणेनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल़े

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man assaulted for eve teasing of female employee in thane
First published on: 14-12-2013 at 02:34 IST