मुंबई उपनगरातील विविध जैन मंदिरांत चोरी करणाऱ्या आरोपीस मुंबई गुन्हे शाखेच्या कांदिवली युनिटने अटक केली आहे. दिलीप ऊर्फ दिपू धर्मेद्र मिश्रा (३०) असे त्याचे नाव असून त्याने पाच जैन मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली आहे.
कांदिवली येथील जैन मंदिरात फेब्रुवारी महिन्यात चोरी झाली होती. त्याचा तपास करताना गुन्हे शाखा ११ च्या पथकाने बोरिवलीहून दिलीप मिश्रा या आरोपीला अटक केली. त्याने पाच जैन मंदिरात चोरी केल्याची कबुली दिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ दळवी यांनी सांगितले. चोरलेला ऐवज विकत घेणाऱ्या शिवलाल पटेल (२९) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. जैन मंदिरात चोरी झाल्याने जैन बांधवांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. या आरोपीने अनेक मंदिरात चोरी केल्याची शक्यता असून पोलीस त्याचा तपास करीत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 8th Mar 2013 रोजी प्रकाशित
जैन मंदिरात चोरी करणारा अखेर गजाआड
मुंबई उपनगरातील विविध जैन मंदिरांत चोरी करणाऱ्या आरोपीस मुंबई गुन्हे शाखेच्या कांदिवली युनिटने अटक केली आहे. दिलीप ऊर्फ दिपू धर्मेद्र मिश्रा (३०) असे त्याचे नाव असून त्याने पाच जैन मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली आहे.
First published on: 08-03-2013 at 02:18 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man held in jain temple robbery