scorecardresearch

Premium

जाणून घ्या कळंबोलीत आता काय आहे स्थिती

आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने पुकारलेला बंद मागे घेतला असला तरी कळंबोलीत अजूनही तणावपूर्ण परिस्थिती आहे.

मोर्चा
मोर्चा

आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने पुकारलेला बंद मागे घेतला असला तरी कळंबोलीतील तणाव अजून निवळलेला नाही. कळंबोलीत जमावाने पुन्हा एकदा रास्ता रोकोचा प्रयत्न केला. अचानक चालून आलेल्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांची मोठी कुमक या भागात असून पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यावरुन हटवले असून वाहतूक पुन्हा सुरळीत सुरु झाली आहे.

काही वेळापूर्वीच कळंबोलीतील रास्ता रोको मागे घेण्यात आला होता. तब्बल सहा तास आंदोलकांनी हा रस्ता रोखून धरला होता. मराठा समाजाने पुकारलेल्या बंदचे तीव्र पडसाद कळंबोलीत उमटलेले पाहायला मिळाले. कळंबोलीतील रास्ता रोकोमुळे पुण्याकडे व कोकणाकडे जाणारी वाहतूक ठप्प होती.

कळंबोलीत जमावाने पोलिसांच्या दोन गाडया पेटवून दिल्या. हिंसक झालेल्या या जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांडया फोडाव्या लागल्या.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maratha reservation strike kalmboli stone pelting at police

First published on: 25-07-2018 at 18:25 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×