‘दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान’च्या वतीने देण्यात येणारे वर्ष २०२० साठीचे ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार’ शनिवारी त्यांच्या ७९ व्या स्मृतिदिनी जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कारार्थींना त्यांचे पुरस्कार घरी नेऊन दिले जाणार आहेत. यावेळी कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा, संगीतकार प्यारेलाल शर्मा आणि अभिनेते नाना पाटेकर यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या अनेक वर्षांपासून वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान’च्या वतीने संगीत, समाजसेवा, रंगभूमी, साहित्य, चित्रपट, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना मंगेशकर कु टुंबीयांकडून हा पुरस्कार दिला जातो.

यंदा वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीसाठी डॉ. प्रतित समधानी, डॉ. अश्विान मेहता, डॉ. राजीव शर्मा, डॉ. जनार्दन निंबाळकर, डॉ. निशित शहा यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कारा’ने गौरवण्यात येणार आहे. तर ज्येष्ठ कवी-गीतकार संतोष आनंद, ज्येष्ठ गायिका – संगीतकार मीना खडीकर, ज्येष्ठ गायिका – संगीतकार उषा मंगेशकर यांच्यासह वृत्तपत्र पत्रकारितेसाठी दै. सामनाचे कार्यकारी संपादक शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Master dinanath mangeshkar award to sharmila tagore and nana patekar akp
First published on: 25-04-2021 at 00:13 IST