मुंबई : शीव येथील ॲन्टॉप हिल परिसरात राहणाऱ्या नऊ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर मुंबईमध्ये दुसऱ्या दिवशी आणखी एका बाळाचा गोवरने बळी घेतला. ट्रॉम्बे येथील चिता कॅम्पमधील सहा महिन्यांच्या मुलीचा शुक्रवारी गोवरने संशयित मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली. मृत्यू निश्चित अहवाल समितीच्या अहवालानंतरच बालकाचा मृत्यू गोवरमुळे झाला होता का याबाबत स्पष्टता येईल, अशी माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली. त्यामुळे गोवरामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २३ वर पोहोचली आहे. यापैकी तीन मृत्यू हे मुंबई बाहेरील आहेत.

हेही वाचा >>> मुंबईतील हवेत किंचीत सुधारणा

tankers, Tanker inspection drive,
टॅंकरच्या बेदरकारपणाला आवर, अपघात दुर्घटनेनंतर वाहतूक विभागाकडून टॅंकर तपासणी मोहीम
old lady dies with 5-year-old grandson in tanker accident
टँकर अपघातात ५ वर्षीय नातवासह आजीचा मृत्यू
vasai worker death, vasai labor death marathi news
वसई: बांधकामाची भिंत कोसळून एकाचा मृत्यू, एक जण जखमी
नाना पेठेत दुर्घटना! क्रेनचा हुक डोक्यावर पडून कामगार मृत्युमुखी | Worker died after crane hook fell on his head
नाना पेठेत दुर्घटना! क्रेनचा हुक डोक्यावर पडून कामगार मृत्युमुखी

ट्रॉम्बे येथील चिता कॅम्पमधील सहा महिन्यांच्या मुलीला ९ जानेवारी रोजी ताप, खोकला आणि सर्दीचा त्रास होऊ लागला. ११ जानेवारी रोजी बाळच्या शरीरावर पुरळ आले. बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने पालकांनी १२ जानेवारी रोजी त्याला महानगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. महानगरपालिका रुग्णालयातील अतिदक्षता विभागात बाळावर उपचार सुरू करण्यात आले. श्वसनक्रिया निकामी झाल्याने बाळाला जीवन रक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले. आवश्यक ते सर्व उपचार करूनही बाळाची प्रकृती खालावत गेल्याने २० जानेवारी रोजी रात्री ११ वाजता बाळाचा मृत्यू झाल्यचे जाहीर करण्यात आले. या बाळाला लसीचा कोणतीही मात्रा देण्यात आली नव्हती. दरम्यान, मुंबईमध्ये शनिवारी गोवरचा एकही बाधित रुग्ण आढळला नसून, रुग्णांची संख्या ६०६ इतकी आहे. तर १९ रुग्ण संशयित आढळले असून संशयित रुग्णांची संख्या ५,६६९ इतकी झाली आहे. महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या ६५ रुग्णांपैकी ५६ रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. पाच रुग्णांना प्राणवायू यंत्रणा लावण्यात आली आहे. चार रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.