केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज(बुधवार) पत्रकार परिषद घेत शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कालच्या पत्रकार परिषदेवरून शिवसेना आणि संजय राऊत यांच्यासह शिवसेना नेत्यांवर जोरदार टीका केली. या वेळी त्यांनी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांची देखील खिल्ली उडवल्याचे दिसून आले. तर, राणेंकडून झालेल्या टीकेवर शिवसेनेकडूनही खासदार विनायक विनायक राऊत यांनी उत्तर दिले. शिवाय, मिलिंद नार्वेकर यांनी देखील ट्वीट करून नारायण राणेंनी उडवलेल्या खिल्लीला प्रत्युत्तर दिले आहे.

“बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?” असं ट्वीट करून मिलिंद नार्वेकर यांनी नारायण राणे यांच्यावर पलटवार केला आहे.

BJP Demands Action, Against Sanjay Raut, for Insulting navneet rana , Campaign Speech, sanjay raut controversial statment, amravati lok sabha seat, lok sabha 2024, bjp, shivsena,
“वस्त्रहरणाच्या वेळी भीष्माचार्य, द्रोणाचार्य जसे चूप बसले तसेच काल संजय राऊत…”.
jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
jaya bachchan opens up on relationship with amitabh bachchan
जया बच्चन यांनी बिग बी यांच्याबरोबरच्या नात्याबाबत केला खुलासा, नातीच्या शोमध्ये म्हणाल्या, “माझे पती…”
bjp keshav upadhyay article targeting sharad pawar uddhav thackeray and praskash ambedkar
संगीत खंजीर कल्लोळ…

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेस एकनाथ शिंदे, अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांच्यासह शिवसेनेचे महत्वाचे नेते नव्हते, असं माध्यम प्रतिनिधीने म्हणताच नारायण राणे यांनी, “मिलिंद नार्वोकर कोण आहे? ते पूर्वी मातोश्रीमध्ये बॉयचं काम करायचे ते काय? माझ्या समोरची गोष्ट आहे. बेल मारली की, काय आणू असं म्हणणारा आता नेता बनला. काय अपग्रेडेशन स्पीड आहे?” असं म्हणत मिलिंद नार्वेकर यांची खिल्ली उडवली होती.

“संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर, त्यांना सुपारी मिळाली आहे”, नारायण राणेंचा गंभीर आरोप!

तर, एकनाथ शिंदे आणि अनिल परब यांच्याबद्दल काय बोलायचं अनिल परब हे प्रख्यात वकील आहेत. आता अॅडव्होकेट जनरलाच मार्गदर्शन करतात, कोणाला कुठे अटक करावी यासाठी त्यांचेच फोन जातात. आता ते आतमध्ये गेल्यानंतर त्यांना किती फोन जातात हा प्रश्नच आहे. असंही नारायण राणेंनी यावेळी म्हटलं.

“…त्या चौकशीला घाबरूनच नारायण राणेंनी भाजपासमोर लाचारी पत्कारली ” ; राणेंच्या प्रहाराला शिवसेनेकडून लाव रे व्हिडिओतून प्रत्त्युतर!

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची पत्रकार परिषद होताच काही वेळातच मिलिंद नार्वेकर यांनी ट्वीटद्वारे राणेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे. तर, शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी देखील पत्रकार परिषद घेत व लाव रे तो व्हिडिओ या स्टाईलमध्ये नारायण राणे आणि भाजपावर जोरदार टीका केली.