ईश्वर तायडे यांच्यापाठोपाठ मनसेचे नगरसेवक सुरेश आवळे मंगळवारी मनसेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करीत शिवसेनेत दाखल झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ‘मातोश्री’ निवासस्थानी सुरेश आवळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
प्रभाग क्रमांक १२६ (रमाबाईनगर, घाटकोपर)मधील मनसेचे नगरसेवक सुरेश आवळे शिवसेना अथवा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. आवळे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला. ईश्वर तायडे यांच्यापाठोपाठ सुरेश आवळे शिवसेनेत दाखल झाल्यामुळे मनसेला धक्का बसला आहे. मनसेतील काही नगरसेवकांवर भाजपचा डोळा होता.
पालिका निवडणुकीपूर्वी अन्य पक्षांतील चांगल्या नगरसेवकांना भाजपमध्ये घेऊन उमेदवारी देण्याचा भाजप नेत्यांचा इरादा होता. मात्र तत्पूर्वीच मनसेतील नगरसेवक शिवसेनेत दाखल होऊ लागल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns councillor enter in shiv sena
First published on: 04-05-2016 at 00:09 IST