शिवसेनेच्या अयोध्या कार्यक्रमावर आणि उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर महाराष्ट्र निवनिर्माण सेनेने (मनसे) टीका केली आहे. यासंदर्भात मुंबईतील शिवसेना भवन परिसरात मनसेकडून पोस्टरद्वारे शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अयोध्येला निघालो जोशात…राजीनामे मात्र अजूनही खिशात….अशा आशयाचे पोस्टर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शिवाजी पार्क येथील मुख्यालयाच्या समोरचा लावली आहेत. शिवसेना-मनसेकडून अधूनमधून एकमेकांविरोधात राजकीय फटकेबाजी होत असते. अशा प्रकारे यापूर्वीही मनसेने शिवसेनेवर टीकात्मक पोस्टरबाजी केली आहे.

राज्यात आणि केंद्रात भाजपासोबत सत्तेत असतानाही राम मंदिर उभारण्याच्या मागणीवरुन सरकारविरोधात पवित्रा घेतला आहे. भाजपाला इशारा देताना उद्धव ठाकरेंच्याच आपल्या आमदारांचे राजीनामे खिशात असल्याच्या वक्तव्यावरुन मनसेने त्यांना पुन्हा एकदा छेडले आहे.

दरम्यान, दसरा मेळाव्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी आपण २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार, आज उद्धव ठाकरे सहपरिवार खासगी विमानाने अयोध्येकडे रवाना झाले आहेत. तत्पूर्वी हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. त्यानंतर उद्या उद्धव ठाकरे रामलल्लाचे दर्शन घेऊन सभा घेणार आहेत. यामध्ये राम मंदिर उभारण्याची आठवण ते सरकारला करुन देणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns posters flutter on uddhav thackerays tour of ayodhya
First published on: 24-11-2018 at 13:13 IST