मोबाइलवरून झालेल्या क्षुल्लक वादातून एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. घाटकोपरच्या असल्फा व्हिलेज येथे शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. दोन मित्रांमध्ये मोबाईलवरून वाद झाला आणि त्या वादातून दुसऱ्या मित्राने डोक्यात सिमेंटचा कडप्पा घालून त्याची हत्या केली.
असल्फा व्हिलेज येथील सुभाष नगरमध्ये रविवारी मध्यरात्री शरदकुमार गुप्ता (२८) आणि सुधीर राऊळ (२८) हे दोघे मित्र मद्यपान करत बसले होते. सुधीर हा बेरोजगार आहे. तर शरद किरकोळ काम करतो. शरद याचा मोबाइल काही दिवसांसाठी सुधीरला वापरण्यासाठी हवा होता. त्यावरुन दोघांत वाद झाला. सुधीरने तो हिसकाविण्याचा प्रयत्नही केला. त्यावेळी मद्याच्या नशेत असलेल्या सुधीरने जवळ पडलेल्या दीड फूट लादीच्या कडप्पाने शरदकुमारच्या डोक्यावर वार केला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपी सुधीर याला दुपारी असल्फा व्हिलेजमधील त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आल्याचे साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस आर धनेधार यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 17th Dec 2012 रोजी प्रकाशित
मोबाइलच्या वादातून मित्राची हत्या
मोबाइलवरून झालेल्या क्षुल्लक वादातून एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. घाटकोपरच्या असल्फा व्हिलेज येथे शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. दोन मित्रांमध्ये मोबाईलवरून वाद झाला आणि त्या वादातून दुसऱ्या मित्राने डोक्यात सिमेंटचा कडप्पा घालून त्याची हत्या केली.
First published on: 17-12-2012 at 02:30 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mobile become reason for murder