मोहल्ला कमिटी चळवळीला पंचवीस वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने आज अंधेरी पश्चिम येथील वेल्फेअर चिड्रन स्कूल येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आजी माजी पोलीस आयुक्त उपस्थित होते . जातीय सलोखा निर्माण व्हावा समाजात शांती राहावी यासाठी 1994 साली ही मोहल्ला कमिटी स्थापना झाली. मुंबई चे माजी पोलीस आयुक्त रिबेरो ,समाजसेविका सुशोभा बेंद्रे ,आणि तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त सतीश साहनी यांच्या पुढाकाराने हे काम सुरू करण्यात आले . यामुळे तत्कालीन जातीय दंगली शांत होण्यास मोठी मदत झाली. हे काम यापुढे असेच सुरू रहावे यासाठी सर्व प्रयत्न केले जातील असे आश्वासन मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दिले .
या कार्यक्रमात वेगवेगळ्या जाती संप्रदायाचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते .हम सब एक है हे ब्रीद वाक्य घेऊन सामान्य माणसाला या मोहल्ला कमिटीत सहभागी करून घेण्यात आले. पोलीस आणि सामान्य नागरिक यांच्यात सलोखा निर्माण करण्याचा आणि मुंबईत शांतता राखण्यासाठी मोहल्ला कमिटी तत्पर असेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी मुंबईतील वेगवेगळ्या मोहल्ला कमिटीच्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohalla committee celebration 25th anniversary in mumbai
First published on: 19-01-2019 at 21:30 IST