दहा महिन्यांपासून बंद असलेली मोनो रेल्वे सेवा सुरू; तिकीट दरांत बदल नाही

दर १५ मिनिटांच्या अंतराने स्थानकांमध्ये मोनो दाखल होईल. तर दिवसभरात तिच्या १३० फेऱ्या होतील.

गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेली देशातील पहिली मोनो रेल्वे सेवा आज शनिवार पासून पुन्हा सुरू झाली आहे. देशातील पहिली मोनो रेल्वे फेब्रुवारी २०१४ रोजी मुंबईतील चेंबूर ते वडाळा मार्गावर धावली. मात्र नोव्हेंबर २०१७ मध्ये म्हैसूर कॉलनी स्थानकात मोनोला आग लागली. या आगीत मोनोचे २५ कोटींचे नुकसान झाले. तेव्हापासून मोनो बंद होती. शनिवारी सकाळी सहा वाजता पहिली मोनोरेल वडाळा आणि चेंबूर या दोन्ही स्थानकांवरून सुटली

 

चेंबूर ते वडाळा या पहिल्या टप्प्याच्या मार्गावर सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत मोनो पुन्हा धावणार आहे. मोनो रेल्वेचा हा टप्पा सुरू करताना प्रवासी भाडय़ामध्ये वाढ करण्याचा ‘एमएमआरडीए’ प्रशासनाचा विचार होता. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन भाडय़ात वाढ करण्याचा निर्णय घ्यावा, असे एक सदस्यीय समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. त्यानुसार प्रवासी भाडय़ात वाढ न करण्याचा निर्णय ‘एमएमआरडीए’ प्रशासनाने घेतला आहे.

अशी धावणार मोनो –

चेंबूर ते वडाळा या मार्गावर १ सप्टेंबरपासून सकाळी ६ ते सायंकाळी १० या कालावधीत मोनो धावेल.
दर १५ मिनिटांच्या अंतराने स्थानकांमध्ये मोनो दाखल होईल. तर दिवसभरात तिच्या १३० फेऱ्या होतील.
वडाळा स्थानकामधून रात्री ९.५३ आणि चेंबूर स्थानकामधून रात्री १०.०८ मिनिटांनी शेवटची मोनो सुटेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Monorail services between chembur and wadala resumed today

ताज्या बातम्या