पावसाळ्यात मुंबईकरांमध्ये घबराट निर्माण करणारे संदेश व चित्रफिती रोखण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. बुधवारी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी केबलचालक व मोबाइल ऑपरेटर यांना याबाबत सूचना केल्या. कोणत्याही संदेशाचे प्रसारण करण्याआधी त्याबाबत पालिकेकडून माहितीची खात्री करून घ्यावी, तसेच पालिकेकडून देण्यात येणारे अधिकृत संदेश तातडीने प्रसारित करावेत, असे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सांगितले.