मेट्रोमॅन म्हणून ओळखले जाणारे ई. श्रीधरन यांना यंदाचा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे येत्या १२ मार्च रोजी मुंबईत श्रीधरन यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याची घोषणा निवड समितीचे अध्यक्ष डॉ.अनिल काकोडकर यांनी केली. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती प्रित्यर्थ राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्यांची जपणूक करीत आर्थिक, समाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदाच्या पुरस्कारासाठी कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रो असे रेल्वे प्रकल्प उभारणारे ई. श्रीधरन यांची निवड करण्यात आल्याचे काकोडकर यांनी सांगितले.