मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी  प्रभागांचे आरक्षण सोमवारी जाहीर करण्यात आले. आरक्षण सोडतीच्या पहिल्या फेरीत मुंबईतील १५ प्रभाग अनुसुचित जमातींसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. प्रभागाच्या आरक्षण सोडतीत दिग्गज नगरसेवकांचे प्रभागच गायब झाल्याने या प्रस्थापितांना आता नव्याने वॉर्डाचा शोध घ्यावा लागणार आहे.

फेब्रुवारी २०१७ मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रभागांची फेररचना झाली असून सोमवारी वांद्रेयेथील रंगशारदामध्ये आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. या आरक्षण सोडतीमुळे पालिकेतील सर्वच प्रभागांची उलथापालथ झाली आहे. मागील म्हणजे २०१२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अनुसूचित जातीसाठी ११ आणि अनुसूचित जमातीसाठी दोन प्रभाग राखून ठेवण्यात आले होते. यावेळी या आरक्षणासाठी प्रभाग संख्या १७ करण्यात आली आहे. अनुसूचित जातींसाठी प्रभाग क्रमांक २६, ५३, ९३, १२१, १४२, १४६, १५२, १५५, १६९, १७३, १९५, १९८, २००, २१० आणि २५५, तर अनुसूचित जमातींसाठी प्रभाग क्रमांक ५९ व ९९ आरक्षित करण्यात आले आहेत. यापैकी ५३,१२१,१४२,२००,२१० व २२५ हे प्रभाग महिला ‘एससी’ आणि ५९ हा प्रभाग महिला ‘एसटी’ उमेदवारांसाठी राखीव असेल.
प्रभागाच्या पुनर्रचनेत महापालिकेत दिग्गज नगरसेवकांच्या प्रभागांवर कु-हाड कोसळली आहे. काँग्रेसचे प्रवीण छेडा, देवेंद्र आंबेरकर, शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर, शितल म्हात्रे, मनसेच्या संतोष धुरी यांना नवीन प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे. तर अनेक नगरसेवकांचे वॉर्ड फुटल्याने त्यांनाही नव्याने मोर्चेबांधणी करावी लागणार आहे.

Central Park in Thane, Thane,
ठाण्यातील सेंट्रल पार्ककडे पर्यटकांचा ओढा, पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा
appointment of nurses in the municipal hospital was stopped due to the code of conduct
मुंबई : आचारसंहितेमुळे महानगरपालिका रुग्णालयातील परिचारिकांची नियुक्ती रखडली
28 kg of on single use plastic seized by nmmc in navi mumbai
नवी मुंबईत २८ किलो एकल वापर प्लास्टिक जप्त, ९० हजार रुपयांचा दंड वसूल
mumbai, bmc, deficit 2100 crore, three days, left, tax collection, financial year end,
मालमत्ता करवसुलीसाठी मुंबई महानगरपालिकेकडे केवळ तीन दिवस शिल्लक, करवसुलीत २१०० कोटींची तूट

ए (फोर्ट), बी (पायधुनी), सी (चंदनवाडी), डी (ग्रँट रोड) ई (भायखळा) या विभागातील प्रत्येकी एक, तर जी दक्षिण (प्रभादेवी) विभागातील दोन प्रभाग कमी होणार आहेत. पूर्व उपनगरात एम पूर्व (चेंबूर), एन (घाटकोपर) या दोन विभागातील प्रत्येकी एक प्रभाग कमी झाला असून एल (कुर्ला) आणि एस (भांडुप) विभागात एक प्रभाग वाढला आहे. याशिवाय एम पूर्व (मानखुर्द) विभागात दोन प्रभाग वाढले आहेत.
पश्चिम उपनगरात एच पूर्व (सांताक्रूझ) विभागातील एक प्रभाग कमी झाला आहे. तर पी दक्षिण (गोरेगाव) आणि आर उत्तर (दहिसर) या विभागातील प्रभागांची संख्या एकने वाढली आहे. तसंच पी उत्तर (मालाड), आर दक्षिण (कांदिवली) विभागात प्रत्येकी दोन प्रभाग वाढणार आहेत.
नवीन प्रभागरचनेनुसार ५४ ते ५५ हजार लोकांमागे एक नगरसेवक असेल असा अंदाज आहे. सध्या बहुतांशी प्रभाग हे रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूस विस्तारलेले आहे. त्यामुळे नवीन रचनेत रेल्वेमार्गामुळे प्रभाग छेदले जाणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.