मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक रविवारी आणखी एक मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. रविवारी हॉटेल ललितमध्ये अनेक रहस्य आहेत आणि ती समोर आणणार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले होते. त्याबाबत त्यांनी ट्वीट करुन माहिती दिली होती. मात्र पत्रकार परिषदेच्या आधीच नवाब मलिक यांनी एक ऑडिओ क्लिप ट्वीट केली आहे. या क्लिपमध्ये सॅनविल डीसूजा आणि एनसीबीचे अधिकारी व्ही व्ही सिंह यांच्यातील संवाद असल्याचा दावा मलिकांनी केला आहे.

मंत्री नवाब मलिक यांनी सतत काही ना काही खुलासे करण्याचा सपाटाच सध्या लावलेला आहे. सूचक असे ट्विट करुन त्यानंतर काही वेळातच पत्रकार परिषद घेत ते नवनवे आरोप करत आहेत. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर त्यांनी वारंवार आरोप करत त्यांनी बनावट प्रमाणपत्रांद्वारो नोकरी मिळवल्याचे म्हटले आहे. त्यानंतर रविवारी हॉटेल ललितमधील माहिती समोर आणणार असल्याचे नवाब मलिक यांनी याआधी म्हटले होते. त्यानंतर आता नवाब मलिक कोणता नवा खुलासा करणार याकडे आता महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे.

केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
Narayan Rane case, Vinayak Raut, Parab,
२००५ नारायण राणेंच्या सभेतील गोंधळाचे प्रकरण : विनायक राऊत, परब, सावंत, देसाई, रवींद्र वायकर यांची निर्दोष सुटका
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका

या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलने खुलासा करत सॅनविले डिसूझाचे नाव समोर आणले होते. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेआधी सॅनविल स्टॅनले डिसूझा आणि एनसीबीचे अधिकारी एनसीबीचे अधिकारी व्ही व्ही सिंह यांच्या संवादाची एक ऑडिओ क्लिप ट्वीट केली आहे.

नवाब मलिक यांनी ट्वीट केलेल्या क्लिपमध्ये सॅनविल डीसूजा आणि एनसीबीचे अधिकारी व्ही व्ही सिंह यांच्यातील संवाद आहे. यात सॅनविल हा एनसीबी अधिकारी सिंह यांना नोटिशीबाबत विचारणा करत आहे. यामध्ये सॅनविलने व्ही व्ही सिंह यांच्याकडे घरी नोटिस पाठवल्याबाबत विचारणा केली. यावेळी सॅनविलने तब्येत बरी नसल्याने मी सोमवारी एनसीबी कार्यालयात येऊ का? अशी विचारणा केली. त्यावर सिंह यांनी सोमवारी नको मग तू बुधवारी ये असे म्हटले. तसेच तुझा मोबाईल घेऊन ये. माझ्याकडे तुझा आयएमआय नंबर आहे. मी तुला आधीच वॉर्निंग देतोय असे म्हटले.

दरम्यान, याआधी आर्यन खान प्रकरण, कॉर्डेलिया क्रूजवर टाकलेला छापा आणि त्यानंतरची कारवाई या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाईंड सुनील पाटील नावाची व्यक्ती असल्याचा दावा मोहीत भारतीय यांनी केला.