मुंबईहून अलाहाबादमार्गे हावडय़ाला जाणारी १२३२२ डाउन मुंबई- हावडा मेल आज, सोमवारी रद्द करण्यात आली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून रात्री ९.२५ वाजता सुटणारी ही गाडी पूर्व रेल्वेने रद्द केली असल्याचे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात
आले. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वेने दिलगीरी व्यक्त केली आहे.