मुंबईची लोकल म्हटलं की तुफान गर्दी, घड्याळाच्या काट्यावरची धावपळ, डब्यात चढण्यासाठीची धडपड आणि जीवावर उदार होउन केला जाणारा प्रवास या सर्व गोष्टी डोळ्यांसमोर येतात. अशावेळी लोकल ट्रेनमध्ये चढताना झालेल्या अपघातात अनेकांचे दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. अशीच एक घटना घडू नये म्हणून मुंबई उपनगरातील डोंबिवली रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या दोन जवानांनी जीवावर उदार होऊन एका महिलेचे प्राण वाचवले आहेत. ही महिला सुखरूप असून हा सर्व थरारक प्रकार रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद झाला आहे.

नेमकं घडलं काय?

आज सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारासची ही घटना आहे. सीएसटीकडे जाणारी एक लोकल ट्रेन स्थानकावर थांबल्यानंतर त्यात सर्व प्रवासी चढले. मात्र, जशी लोकल सुरू झाली, तशी एक महिला मागून धावत येऊन महिला डब्यात चढण्याचा प्रयत्न करू लागली. मात्र, चढताना हातातील सामानामुळे या महिलेचा तोल सुटला आणि ती दरवाज्यातून खाली पडली.

garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
श्श्श्श… वाघोंबांची तलावामध्ये सुरू आहे पूल पार्टी; ‘ठंडा ठंडा कुल कुल’मुळे बाहेर निघायलाच तयार नाही
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला
heat Caution warning of health department in the background of heat stroke mumbai
तापत्या राजकीय वातावरणात उष्माघाताचा फटका; उष्मघाताच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचा सावधतेचा इशारा!

एव्हाना लोकलनं वेग पकडला होता. त्यामुळे सदर महिला लोकल ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकण्याची शक्यता होती. पण तिथेच उभ्या असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत या महिलेला मागे ओढले. सदर महिलेने महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या त्या दोन जवानांचे, रेल्वे पोलिसांचे आणि आरपीएफचे आभार मानले आहेत.

प्रवाशांना पोलिसांचं आवाहन

चालती गाडी पकडताना प्रवाशांचा तोल जाऊन अपघात होण्याचे प्रमाण जास्त असते. आशा अनेक घटना देखील घडतात. मात्र प्रवाशांनी चालती गाडी पकडण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकेश ढगे यांनी केले आहे.