कुलाबा- वांद्रे-सीप्झ या मेट्रो 3 मार्गिकेच्या भुयारीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फत हे काम करण्यात येत असून सात टप्प्यात हे काम सुरू आहे. दरम्यान, शुक्रवारी भुयारीकरणाच्या कामादरम्यान अचानक बोगद्याचा काही भाग कोसळला आणि यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला. टनल बोअरिंगच्या दरम्यान ही घटना घडल्याचे समोर आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई मेट्रो 3 च्या मार्गिकेचे काम सात टप्प्याक करण्यात येत आहे. तसंच या मेट्रोच्या भुयारीकरणाचे कामही सुरू आहे. शुक्रवारी भुयारीकरणाच्या कामादरम्यान जमिन धसल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. तर अन्य एक कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर त्वरित कामगारांना त्या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आलं. तसंच त्यांना त्वरित रूग्णालयात जाखल करण्यात आलं. दरम्यान, या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून संबंधित कामगारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात येणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai metro 3 incidence happened one worker dead one injured investigation going on jud
First published on: 14-09-2019 at 08:31 IST