मुंबई : भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त ४,००० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम महानगरपालिकेद्वारे हाती घेण्यात येणार आहे. तसेच भांडुप संकुलाशी संबंधित असलेल्या विविध जलवाहिन्यांवर दोन ठिकाणी झडपा बसविणे, नवीन जलवाहिन्यांची जोडणी करणे आणि दोन ठिकाणी उद्भवलेली गळती दुरुस्त करणे इत्यादी कामे हाती घेतली जाणार आहेत. यामुळे ३० जानेवारी रोजी चोवीस तासांसाठी पश्चिम आणि पूर्व उपनगरांत पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

पाणीपुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी पालिकेने विविध कामे हाती घेतली आहेत. या कामांमुळे ३० जानेवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी ३१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपर्यंत मुंबईतील २४ विभागांपैकी १२ विभागांतील पाणीपुरवठा पूर्णत: बंद असणार आहे, तर दोन विभागांतील पाणीपुरवठय़ात २५ टक्के कपात करण्यात येणार आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली आहे.

Dombivli, MMRDA to Close mothagaon Mankoli Flyover , mothagaon Mankoli Flyover, mothagaon Mankoli Flyover Bridge Close for four days, dombivali news, Mankoli Flyover Bridge news, Weight load Checking, marathi news, dombivali flyover close
डोंबिवलीतील मोठागाव माणकोली पूल चार दिवस वाहतुकीसाठी बंद
water supply, Kandivali,
कांदिवली बोरिवलीमध्ये गुरुवारपासून २४ तास पाणीपुरवठा बंद
Water supply stopped in Goregaon Malad Kandivali on Tuesday
मुंबई : गोरेगाव, मालाड, कांदिवलीमध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद
bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार

पश्चिम उपनगरांतील अंधेरी पूर्व, पश्चिम, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, वांद्रे पूर्व व पश्चिम या नऊ विभागांमधील अनेक परिसरांतील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असणार आहे. तर पूर्व उपनगरांतील भांडुप, घाटकोपर, कुर्ला येथील अनेक भागांतदेखील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असणार आहे.

मात्र दादर, माहीम पश्चिम, प्रभादेवी व माटुंगा पश्चिम या परिसरांतील पाणीपुरवठय़ात दि. ३० व ३१ जानेवारी २०२३ रोजी २५ टक्के कपात करण्यात येणार आहे. तर धारावी परिसरातील ज्या भागात दुपारी ४ ते सायंकाळी ९ यादरम्यान पाणीपुरवठा होतो, त्या भागात ३० जानेवारी २०२३ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे.

पाणीपुरवठा खंडित असण्याच्या कालावधीत व पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याच्या कालावधीदरम्यान नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावे व महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.