आपण गावाला जाण्यास निघालो किंवा गावाहून मुंबईच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघालो की हमखास ओळखीची मंडळी एखादी वस्तू किंवा खाऊ त्यांच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याकडे देतात. आपण हे काम कोणताही मोबदला न घेता स्वखुशीने करतो. कारण त्यात नात्यांचा ओलावा असतो. पण जर एखादेवेळेस मित्राच्या मित्राने त्याच्या मित्राला काही तरी सामान पोहोचवण्यास सांगितले तर आपण ते काम कसे टाळता येईल याचा प्रयत्न करत असतो. या कामाचा आपल्याला काही मोबदला मिळाला तर आपण हे काम नक्कीच आनंदाने करू. कुणाच्या राहिलेल्या किंवा कुणाला भेट म्हणून द्यायच्या वस्तू आपण प्रवास करत असलेल्या मार्गावर असतील तर त्या पोहोचवण्याचे काम करून आपण पैसे कमवू शकतो. ही संधी www.beckfriends.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून सर्वासाठी खुली झाली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा लघु उद्योजकांसाठी ही चांगली संधी असल्याचा दावा ही सेवा सुरू करणारे दीप मल्होत्रा, मयांक बसू, राहुल बसू आणि शिखा पांडे यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्याला एखादी वस्तू कुरिअर करायची असेल तर त्याला लागणारे पैसे, ती वस्तू पोहोचण्यासाठी लागणारा वेळ, त्या वस्तूची सुरक्षा आदी प्रश्न उभे राहतात. याचबरोबर अनेकदा आपण असलेल्या ठिकाणाहून आपल्याला पहिजे त्या ठिकाणी वस्तू पोहोचवण्यासाठी कुरिअर सेवा नसते. तर अनेक वेळा वस्तूचे आकारमान मोठे असल्यामुळे कुरिअर सेवा कंपन्या ती पोहोचवण्यास नकार देतात. अशा वेळी अनेकदा वस्तू पाठविण्याचे काम अवघड होऊन जाते. मग कोणतीही वस्तू कोठेही पोहोचवणे कसे शक्य होईल याचा विचार सुरू झाला आणि मायस्पेस डॉट कॉम, रेडिफ डॉट कॉमसारख्या कंपन्यांमध्ये काम करण्याचा दांडगा अनुभव असलेल्या दीप मल्होत्रा यांनी बेक फ्रेंड्सची संकल्पना सुचली. विद्यार्थी प्रकल्पाच्या निमित्ताने किंवा उद्योजक त्यांच्या व्यवसाय वृद्धीच्या निमित्ताने देशभरात किंवा जगभरात प्रवास करत असतात. मग ही मंडळी त्या वस्तू त्यांच्या प्रवासाच्या ठिकाणी नेऊ शकतील आणि याचा मोबदला म्हणून त्यांना काही पैसे देता येतील. अशी कल्पना त्यांनी मांडली. ही कल्पना त्यांच्या सह संस्थापकांना रुचली आणि त्यांनी त्यावर पुढचे काम सुरू केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai youth started new business
First published on: 21-07-2016 at 02:22 IST