निवडणुका जिंकण्यासाठीच शेवटचा पर्याय म्हणून भाजपकडून गुंडाचा वापर केला जात आहे. तुरुंगातून बाहेर निघाल्यानंतर पापमुक्तीसाठीच गुंड भाजपत प्रवेश करत आहेत, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. भाजप स्वतः ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे म्हणवून घेतो. पण सध्या राजकारणात एक वेगळाच ‘डिफरन्स’ पाहायला मिळत आहे, अशी खोटक टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अनेक पक्षांमध्ये पक्षांतराची लाट आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याबाबत त्यांना विचारले असता, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे. इतर पक्षांचे नेते फोडण्यासाठी सत्तेचा वापर केला जात आहे, असा आरोप मुंडे यांनी केला. पक्षातील ‘आऊटगोईंग’चा काहीही परिणाम होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपने कितीही प्रयत्न केले तरी, पुणे महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता येणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

cm eknath shinde held meeting of party leaders in thane
ठाण्यासाठी मुख्यमंत्र्यांची अडीच तास बैठक
ommission active to prevent supply of liquor during elections
निवडणुकीतील मद्याचा महापूर रोखण्यासाठी आयोग सक्रिय
Map , Akola district, human chain,
मानवी साखळीतून साकारला अकोला जिल्ह्याचा नकाशा
Lok Sabha Election 2024 Phase 1 Live Updates in Marathi
पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान; १९ राज्यांमधील १०२ मतदारसंघ सज्ज

भाजप गुंडांना प्रवेश दिला जातो, असा आरोप होत आहे. त्यावरूनही त्यांनी भाजपवर निशाणा साधला. सध्या भाजपची वाईट अवस्था आहे. गुंडांची गरज आज भाजपला वाटते. हे दुर्दैव आहे. गुंड पापमुक्तीसाठी भाजपत प्रवेश करत आहेत, अशी खिल्ली सोशल मीडियावर उडवली जात आहे. राजकारणात शेवटचा पर्याय म्हणून गुंडांचा वापर केला जातो. भाजपने निवडणुका जिंकण्यासाठी हा शेवटचा पर्याय निवडला आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

ठळक मुद्दे…

– कॅम्पेनिंग करण्यात राज्य सरकार आघाडीवर आहे. आतापर्यंत नुसत्या घोषणाच केल्या. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही.

– भाजपचे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी, त्यांना वाचवण्यासाठी कर्जमाफी करावी. दुष्काळाने शेतकरी होरपळतोय. त्यांना कर्जमाफी करून दिलासा द्यावा.

– शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, अशी मागणी दोन वर्षांपासून लावून धरली आहे. पण हे सरकार शेतकऱ्यांच्याच विरोधात आहे. हमीभावात वाढ करणे गरजेचे आहे.

– शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या, पण अंमलबजावणी नाही. या सरकारचा निषेध करत आहोत. आगामी अधिवेशनात या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरू.

– ‘अच्छे दिन’ ऐकायला बरे वाटते. पण त्याने बेरोजगारी कमी झाली नाही. नोटाबंदीने बेरोजगारी वाढेल. नोटाबंदीचा पुढील काही वर्षे मोठा फटका बसेल. त्याला केंद्र आणि त्याचे समर्थन करणारे राज्य सरकार जबाबदार असेल.

– मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. ३१ जानेवारीला मराठा समाजातर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे, अशी त्यांची ठाम मागणी आहे. त्यांच्या मागणीचे मी समर्थन करतो.

– छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या नावाखाली मराठा समाजाच्या मागण्या दाबण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. हे योग्य नाही.

– मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधात हे राज्य सरकार आहे. त्यांना बहिष्कृत नजरेने पाहणे, हे दुर्दैवी आहे.

– ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

-जातीपातीच्या पलिकडेही जाऊन राजकारण करावे. जास्तीत जास्त तरुण राजकारणात आले तर राजकारणाला लागलेली जातीयवादाची किड नष्ट होण्यास मदत होईल.

– राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांचे घोटाळे बाहेर आले आहेत. त्या घोटाळेबाजांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली आहे. पुरावे देऊनही त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई होत नाही. त्यांनी खात राहावे आणि आम्ही संभाळून घ्यावे, अशीच भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.

– घोटाळेबाजांना मुख्यमंत्री वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. त्यातून सिद्ध झाल्यास न्यायालय राज्य सरकारला चौकशीचे आदेश देईनच. त्यानंतर राज्य सरकार उघड्यावर पडेल.

– मुंबई महापालिका निवडणुकीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. नगरसेवकांची सध्याची जी संख्या आहे, त्यात वाढ करण्याचा प्रयत्न असेल. भविष्यात मुंबई आणि विदर्भात राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकावर असेल.

– पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणारच. भाजपने कितीही प्रयत्न केले तरी त्याचा फायदा होणार नाही.

– तीन महिन्यांपूर्वी पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. येत्या निवडणुकांना कर्तुत्व असलेल्या पक्षातील तरुणांनाच संधी दिली जाणार आहे.

– भाजपमध्ये गुंडांना प्रवेश दिला जात आहे. ‘पार्टी ऑफ डिफरन्स’ म्हणवून घेतल्या जाणाऱ्या पक्षात वेगळाच डिफरन्स दिसत आहे. तुरुंगातून सुटलेले गुंड भाजपत पापमुक्तीसाठी जात आहेत. काशीला जाण्याऐवजी भाजपत जा, असे गुंड म्हणू लागले आहेत, असे विनोद सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून गुंडाचा वापर केला जात आहे.

– सत्तेचा वापर नेते फोडण्यासाठी केला जात आहे. मागील विधानसभेच्या निवडणुकीतही तसाच प्रकार केला होता. पक्षातील आऊटगोईंगचा काहीही परिणाम होणार नाही.

– महाराष्ट्रातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी काही योजना असतील, तर त्या आणण्याबाबत प्रयत्न करू शकतो.

– मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत. त्यामुळे ते उद्ध्वस्त होतील. याबाबत केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल.


– जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक प्रश्न सोडवता येऊ शकतात.

– बीड जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असूनही मागासलेपण गेलेले नाही. भाजप अपयशी ठरले आहे.

– भाजपमधून बाजुला केले. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. कारण जनतेच्या हितासाठी राष्ट्रवादी पक्ष काम करतो. शब्द पाळणारा एकमेव पक्ष आहे.

– राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राजकारणातील चालते-बोलते विश्वविद्यापीठ आहे.

– पंतप्रधानांनी बारामतीतील काम पाहून पवार यांची स्तुती केली आहे. त्यांना सन्मान स्वीकारायलाच हवा. विरोधी पक्षनेता म्हणून माझी भूमिका वेगळी आहे. सरकार कमी पडत असेल तर त्यांना जागे करण्याचे काम माझे आहे. सरकारविरोधात संघर्ष करण्याचे माझे काम आहे.

– राम गणेश गडकरी पुतळा वादावर सरकारने लोकभावनेचा आदर करायला हवा. सरकार मात्र जबाबदारीपासून दूर पळत आहे.

– औद्योगिक क्षेत्रात राज्याची घसरण झाली आहे.

– सरकारमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे. येथे पोलिसच सुरक्षित नाहीत. सत्ताधारी पक्षाचे नेतेच पोलिसांना दमदाटी करतात.

– राज्य आणि केंद्र सरकार हे घोषणाबाजांचे सरकार आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका.

गोपीनाथ मुंडे यांनी सर्वसामान्यांसाठी संघर्ष केला. तो पुढे चालूच ठेवणार. त्यासाठी आणखी आक्रमक होईल. मुंडे सर्वसामान्यांशी जोडलेले लोकनेते होते. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे हा त्यांचा गुण माझ्या अंगी आहे.

– माझ्या वक्तृत्वात दीवंगत प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचा प्रभाव.

– कोणतेही पद राजकीय संघर्षातून मिळवावे लागते. पंकजा मुंडे यांना ते मिळाले आहे. पद मिळूनही त्यांच्याकडून अपेक्षाभंग झाला.

– तरुणांनी राजकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. त्यांच्यात परिवर्तनाची ताकद आहे. त्यांनी अन्यायाविरोधात लढले पाहिजे. एक मोठी चळवळ उभी करण्याची ताकद त्यांच्यात आहे. अधिकाधिक तरुणांनी राजकारणात यावे.