आईवरून शिवीगाळ केल्याने प्रसन्नजीत मंडल (१९) या कारागिराने अशोक कुमार दत्ता उर्फ बबलू (४४) या व्यापाऱ्याची मंगळवारी सकाळी भुलेश्वर येथे हत्या केली. बनवायला दिलेले दागिने वेळेत न मिळाल्याच्या मुद्यावरून त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता.
भगतवाडी येथे प्रताप विश्वनाथ दत्ता यांचा सुवर्णालंकारांचा कारखाना आहे. तेथे प्रसन्नजीत कारागीर होता. कांदिवलीतील व्यापारी अशोक कुमार दत्ता येथून दागिने घेऊन विकत असत. मात्र बरेच दिवस सांगितलेले दागिने न मिळाल्याने मंगळवारी त्यांचा प्रसन्नजीतशी वाद झाला. त्यावेळी त्यांनी आईवरून शिव्या दिल्याने त्याने लोखंडी फुकणीने त्यांच्या डोक्यात वार केले. त्यातच त्यांचा अंत ओढवला.
संग्रहित लेख, दिनांक 20th Dec 2012 रोजी प्रकाशित
आईवरून शिव्या दिल्याने हत्या
आईवरून शिवीगाळ केल्याने प्रसन्नजीत मंडल (१९) या कारागिराने अशोक कुमार दत्ता उर्फ बबलू (४४) या व्यापाऱ्याची मंगळवारी सकाळी भुलेश्वर येथे हत्या केली. बनवायला दिलेले दागिने वेळेत न मिळाल्याच्या मुद्यावरून त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता.
First published on: 20-12-2012 at 06:28 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder for rubbished